Ticker

10/recent/ticker-posts

माळशेज घाट बनतोय मृत्यूचा महामार्ग!

पावसाळ्यात माळशेज घाटात पर्यटकांची जत्रा भरलेली असतेवर्षा सहलीचा आंनद  घेण्यासाठी मुंबई, पुणेनाशिकठाणे शहरांतील पर्यटक या ठिकाणी आवर्जून हजेरी लावतातपावसाळ्यात दरडी 
कोसळण्याच्या घटना दरवर्षी घडत असल्याने यापुढे पावसाळ्यात पर्यटनाला जाणाऱ्यांसाठी ही 
धोक्याची घंटा आहे

महाराष्ट्रात पर्यटकांसाठी 'हॉट डेस्टिनेशन' असणारा माळशेज पाट सद्य:स्थितीला 'मृत्यूचा घाट' बनत असल्याचे चित्र समोर येत आहे. गेली दहाहून अधिक वर्षे धुळखात पडलेल्या कल्याण- अहमदनगर व्हाया नाणेघाट-ओतूर या १३५ किमी रेल्वेमार्गाच्या प्रस्तावाला केंद्राच्या उदासीन धोरणामुळे गती मिळालेली नाही. १मे १९७४मध्ये हा घाटरस्ता प्रवासासाठी खुला झाला. कल्याण-मुरबाड-माळशेज-अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावर २०१३ मध्ये जवळपास ४५ अपघात झाले आहेत. त्यात १७ जणांचा मृत्यू, तर ३८ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील अंदाजे २० अपघात हे एसटी बसचे होते. प्रवासाच्या दृष्टीने काहीसे कठीण असणाऱ्या या घाटाच्या सुरक्षितेबाबत अजूनपर्यंत कोणत्याही ठोस उपाययोजना न केल्यामुळे भविष्यातही असे अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही


मुळातच रेल्वे नाही, त्यामुळे या ठिकाणाहून जा-ये करण्यासाठी रस्ता वाहतुकीचा एकमेव पर्याय नागरिकांना उपलब्ध आहे. त्यामुळे या ठिकाणाहून रेल्वेमार्ग व्हावा, याबाबतचा प्रस्ताब गेली कित्येक वर्णे प्रवासी वर्ग, संघटना मागणी करत आहे. पण, त्याला शासनाकडून केराची टोपली दाखविण्यात येतआहे. दरवर्षी माळशेज घाटातील रस्ते दुरूस्तीसाठी कित्येक कोटी रूपये खर्च केले जातात. तरीही महागार्ग क्र.२२२ वरील माळशेज घाटातील प्रवास सुरळीत होण्याऐवजी दिवसेंदिवस धोकादायक बनला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बांधकाम अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष व चालकांची बेपर्वाई. या घाटात अनेक ठिकाणी कोट्यवधी रूपये खर्च करून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून संरक्षक कठडे बांधले आहेत. मात्र, ठेकेदाराने सिमेंट खडीचा वापर न करता, केवळ दगडांचा भरणा केल्याने या संरक्षक कठड्यांचा दर्जा सुमार झाला आहे. ठेकेदार आणि अभियंते निकृष्ट दर्जाची कामे प्रवाशांच्या जीवावर बेतणारी आहेत. शिवाय हे संरक्षक कठडे कमी उंचीचे असल्याने वाहने अपघातानंतर कठडा तोडून थेट दरीत जातात. घाट परिसरात सुरू असलेली मागील काही काळात झालेली भरावाची  काँक्रीटच्या संरक्षक कठड्यांची कामे निकृष्ट झाली आहेत


काँक्रीटच्या कामांत तुरळक स्टील वापरून दगडांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. काँक्रीटवर पुरेसे पाणी मारल्यामुळे सिमेंट, रेतीचा भाग भुगा होऊन सर्व संरक्षक भिंती कमकुवत झाल्या आहेत. घाटाची संरक्षक भिंत मजबूत असती, तर २०१४च्या सुरूवातीस माळशेज घाटात २७ जीवांचा बळी कदाचित गेला नसता. प्रवाशांच्या दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या या घाटात दरड कोसळणे, अपघात घडणे हे नित्याचेच प्रकार आहेत. त्यामुळे या घटना घडल्यानंतर अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी घाट परिसरात रूग्णवाहिका, अभिशमक दल, जेसीबी, गिर्यारोहकांची टीम इत्यादी सोयीसुविधा उपलब्ध नाहीत.

 

पावसाळ्यात माळशेज घाटात पर्यटकांची जत्रा भरलेली असते. वर्षा सहलीचा आंनद घेण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे . शहरांतील पर्यटक या ठिकाणी आवर्जून हजेरी लावतात. पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना दरवर्षी घडत असल्याने यापुढे पावसाळ्यात पर्यटनाला जाणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. पर्यटकांच्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कुठल्याही प्रकारची उपाययोजना व सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही. रस्ता अपघातांचा विचार करताना, त्यात रस्त्यांची सुरक्षितता आणि वाहनचालकाची तसेच त्या वाहनातून प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता या दोन बाबीही महत्त्वाच्या ठरतात. या देशात रस्ते आणि खड्डे यांचे जणू काही  समीकरणच तयार झाले आहे आणि ते वर्षानुवर्षे कायम आहे. त्यामुळे पहिले खडडे बुजवण्यासाठी केलेले डांबरीकरण आणि त्यानंतर पुन्हा पडलेले नवीन खड्डे, ते बुजवण्यासाठी पुन्हा डांबरीकरण असा पाठशिवणीचा खेळ सुरू असतो. वास्तविक माळशेज घाटात अनेक अपघात झालेले आहेत व होत आहेत आणि त्या त्या वेळी अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर बरीच चर्चाही झाली. पण, ते उपाय प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे या घाटातील अपघातांची मालिका किती काळ सुरू राहणार आहे, हा प्रश्‍न आहे. माळशेज घाट अत्यंत अरूंद असल्याने एका वेळी दोन वाहने कशीबशी जातात. परंतु, तिसरे वाहन आल्यावर जीवावर उदार होऊन वाहन प्रवास करावा लागतो. कसारा घाटाप्रमाणे येथेही दुभाजक असणे आवश्यक आहे.

 

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या