Ticker

10/recent/ticker-posts

सोने वापरा, पण सावध राहा !

आपल्या संस्कृतीत मंगळसूत्र हे सौभाग्याचे लक्षण तर आहेच, पण ते दोन घराण्यांना जोडणारा दुवासुद्धा आहे. मंगळसूत्र हा स्त्रीचा सौभाग्य अलंकार मानला जातो. आजकाल स्त्रिया कामानिमित्त घराबाहेर पडतात. त्यामुळे मंगळसूत्र,  चेन वगैरे आलेच. एखादी आवडती वस्तू हरवणं किंवा चोरी होणं, हे दु:खदायकच असतं. महिलांच्या बाबतीत दागिने हा जिव्हाळ्याचा विषय. दागिने चोरीला गेले किंवा हरवले तर..?  तर त्यामागे फक्त दु:खच असतं. मात्र,  रस्त्यावरून जाताना अचानक एखाद्या मोटारसायकलस्वाराने दागिने हिसकांवणं, अनेकदा त्या महिलेसाठी घराबाहेर पडताना कायमच भीती निर्माण करणारं ठरतं. त्या एका हिसक्याचा धक्का त्यांना आयुष्यभर बसतो


अलीकडे मंगळसूत्र चोरीच्या घटना वाढत आहेत, हे प्रचंड महागाई व ढासळलेली नैतिकता याचे प्रतीक आहे. सध्या अलीकडे वृत्तपत्रात रोजच्यारोज मंगळसूत्र चोरीला जात असल्याच्या बातम्या येत आहेत. म्हणून महिलांना, प्रश्‍न पडत आहे की, ते वापरावे की नाही. खोटं घातले तर गुंडांकडून मारण्याची भीती किंवा अलर्जी होण्याची भीती! याबाबत थोडा अभ्यास केल्यावर लक्षात येते की, स्त्रियांना मोठी, जाडजूड, लांब मंगळसूत्र घालायची आवड असते, शिवाय ते पदर/ओढणीच्यावर घालतात. सर्वाना कळावे की, श्रीमंतीच प्रदर्शन व्हावे, यासाठी ते वर ठेवतात की, कायं कोण जाणे. पण, चोरांना दुचाकीवरून जाता जाता, असे दागिने सहजपणे खेचायला मिळतात


रोज अशा बातम्या वाचूनही आम्ही मात्र कोणताही धडा घेत नाही.  पुढच्यास ठेच लागली, तरी आपण त्याच रस्त्याने जातो. रस्त्यात कोण काय सांगेल, त्यांच्यावर चटकन विश्‍वास ठेवतोकोणाच्या सांगण्याला फसून आपल्या हातानेच काही स्त्रिया आपले दागिने काढून पर्समध्ये ठेवता ठेवता सांगणारा ते हिसकावून घेतो. तसेच रिक्षा किंवा टॅक्सीतून जाताना, वाहनतळाजवळ आलेल्या व्यक्तीकडे प्रवाशाचं लक्ष नसते. टॅक्सी-रिक्षा सिग्नलला थांबली आणि प्रवासी कामात किंवा गप्पांत गुंतलेला दिसला की, चोरटा झडप घालतो. कधी रिक्षात हात घालून, तर कधी टॅक्सीच्या खिडकीतून पर्स, पाकीट, बॅग पळवतो.


वृद्ध नागरिक तसेच महिला याच बहुतेक टार्गेट असतात. धष्टपुष्ट तरूणांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याची हिंमत चोरटे करत नाहीत. तसेच सदृढ तरूणींच्याही वाट्याला चोरटे जात नाहीत, कारण साखळी खेचताना, मोटारसायकल थांबलेली नसते. साखळी हिसकावताना प्रतिकार झाला आणि गाडीला थोडा जरी धक्का लागला, तरी गाडीवरून पडण्याची किंवा जबर मार लागण्याची भीती असते. त्यामुळे वृद्धांना टार्गेट करणे त्यांना सोपं जातं. अनेक सराईत चोरटे तर जिभेखाली, हाताच्या नखामध्ये ब्लेड ठेवतात. महिलेच्या अंगावर वार करून सोनसाखळी वा पर्सही पळविली जाते. सोने महाग आहे, म्हणून खोटं मंगळसूत्र घातल्यामुळेमूळ शास्त्रीय उद्देश पूर्ण होणार नाही. केवळ सुरक्षाकवच एवढाच त्याचा उपयोग होईल. अजूनही अनेक उल्लेख करता येईल. तात्पर्य, काय या घटनांना आपण स्वत:सुद्धा ५० टक्के जबाबदार असतो


घर घाण झाले तर ते आपण सोडून जात नाही; ते स्वच्छ करतो. रोग झाला तर तो बारा करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे चोरीला जाते, म्हणून मंगळसूत्र घालायचेच नाही, हा पर्याय योग्य नाही. तर ते सांभाळण्याची काळजी घेणे, सावध असणे घाबरटपणा, बाचळटपणा सोडून जरा तरतरीतपणा, अवलंबणे, यामुळे बऱ्याच चोऱ्या टाळता येतील असे वाटते. सर्वच स्त्रियांच्या दागिन्यांची चोरी होत नाही, तर चोर हे पाहतात की, कोणती स्त्री बेसावध आहे, परिणामी, चोरांचे फावते. त्यासाठी मंगळसूत्र, चेन वर काढून घराबाहेर पडणार असाल, तर दिसणारच. कुणाच्या नजरेत भरेल, असं देखील मंगळसूत्र नसावे. दागिन्यांचे उगाचच प्रदर्शन करू नये. मंगळसूत्र, चेन आंत पदराच्या आड घालून जपावे किंवा छोटंसं, नाजूंकसं मंगळसूत्र परिधान करावे. नाहीतर, जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या घटना रोखण्यासाठी पोलिसांच्या पातळीवर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. पण त्यात नागंरिकांचाही हातभार लागल्यास; पोलिसांचे काम आणखीन सोपे होईल. बाईकस्वार रस्त्यावरील महिलांचे दागिने हिसकावतात, त्यासाठी नेहमी पदपथावरूनच चाला. अंगावंरील दागिन्यांवर दुपट्टा अथवा पदर ठेवा. लग्न-समारंभास जाताना दागिने सोबत घेऊन सभागृहात गेल्यावरच अंगावर घाला. अनोळखी व्यक्तींशी बोलणे टाळा, खोटी ओळख सांगून, बोलण्याचा प्रयत्न झाल्यास, आरडाओरडा करा. मॉर्निंग वॉकला जाताना दागिने घालू नये. स्थानिक पोलिसांना चोरी झाल्याबरोबर कळवावे, गुन्हेगारांच्या वाहनांचा क्रमांक, रंग आदी तपशील पोलिसांना द्यावा.



  





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या