मोबाईल ही माहिती तत्रज्ञान क्षेत्राने एक मोठी देणगी आहे. जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्याशी काही क्षणात संपर्क साधणारी यंत्रणा जगाला खूप जवळ घेऊन आली आहे. वेळ, शक्ती आणि पैसा या गोष्टींची बचत होत असताना कामाची गती वाढवण्याचे काम माहिती तंत्रज्ञानामुळे झाले. मोबाईल, इंटरनेट या सगळ्या सेवा उपयुक्त स्वरूपाच्या आहेत आणि त्या योग्य कारणासाठी वापरल्या तरच त्या वरदान ठरतात, हेही सिद्ध झाले आहे. विज्ञानाने आतापर्यंत ज्या गोष्टींचे शोध लावले, ते सगळे शोध नीट वापरले तर वरदान ठरले आहेत, अन्यथा तो शापही ठरला आहे. त्यातूनच विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरण्याची कितपत आवश्यकता आहे हे एकदा तपासून पाहायला हवे. विद्यार्थी म्हटला की विशेषत: शालेय विद्यार्थी डोळ्यांसमोर येतो. पहिली ते दहावी या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल असण्याची काहीच आवश्यकता नाही. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना थोडीफार आवश्यकता शकते, पण शाळकरी विद्यार्थी हे जर मो बाईलच्या जाळ्यात अडकले, तर त्यांच्या शालेय अभ्यासाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. सध्या बरेच पालक आपल्या मुलांना मोबाईल घेऊन देत असल्याचे निदर्शनास येत आहे.
ज्या वयामध्ये अभ्यासावर लक्ष केंद्रित होणे गरजेचे असते, त्या वयात मोबाईलसारखे साधन विद्यार्थ्यांना मिळाले, तर त्यांच्या हातात आयते कोलीत दिल्यासारखेच होईल, कारण जबाबदारीचे भान नसलेल्या या वयोगटात नको ती साधने दिली गेली तर त्याचा गैरवापरच होण्याची शक्यता असते. आज ज्या विद्यार्थ्याच्या हातात मोबाईल दिसताहेत, त्यातले ९९ टकके विद्यार्थी हे एक चाळा म्हणूनच मोबाईलचा वापर करतात. त्यावर गेम खेळणे, नको त्या गोष्टींचे फोटो घेणे, मोबाईलमध्ये वेगवेगळी गाणी लोड करून कानामध्ये इअर फोन अडकवून तीन- तीन तास गाणी ऐकणारी मुले पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसतो. अशा प्रकारचे गैरवापर होऊ लागले' आहेत. मोबाईल हे संपर्काचे साधन म्हणून गणले जाते. विद्यार्थ्यांच्या संपर्काची कक्षा मर्यादित असते. पालक, शाळा आणि मित्र एवढेच त्यांचे वर्तुळ असते. एवढ्यासाठी त्यांच्या हातामध्ये मोबाईल देणे केवळ चुकीचे नव्हे, तर घातकच म्हणायला हवे. डु तरती मुलाने हषट्ट केला की पालक त्याला चुटकीसरशी मोबाईल काढून देतात. मग ते मूल त्यावर गेम खेळत बसते किंबा गाणी, ऐकण्यात गुंग असते. लग्नसमारंभ असो, वाढदिवस असो किंवा कुठल्याही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर हेच दृश्य आढळून येते की मुलाच्या हातात मोबाईल आणि आईबाबा दुसऱ्या कशात तरी व्यस्त आहेत.
यामुळे पालक आणि मुलांमध्ये
होणारे आपापसातील संवाद हे दुरापास्तच होत
चालले आहेत. परिणामी मुले एकलकोंडी होत
चालली आहेत. अभ्यासाचा ताणतणाव असूनदेखील मुलांमध्ये दिवसेदिवस मोबाईलची क्रेझ वाढत चालली आहे.
जसजसे आधुनिक तंत्रज्ञान विकसित होत चालले आहे,
तसतसा मुलांचादेखील नवीन काहीतरी शिकण्याकडे
कल वाढत आहे. ही स्तुत्य
बाबच म्हणायला हवी, त्याचा
अतिरेक होता कामा नये.
नाहीतर विद्यार्थ्यांचेच नुकसान होईल. एखाद्या उपयुक्त वस्तूचा योग्य कारणांसाठी वापर होईल याचे
भान समाजातल्या जाणत्या पालकवर्गानेही ठेवले पाहिजे. आपल्याकडे पैसे आहेत म्हणून किंवा मुले हट्ट करतात म्हणून
त्यांना मोबाईल घेऊन देण्याची पालकांमधील प्रवृत्ती हीसुद्धा त्यांच्यातल्या बेजबाबदारपणाचे लक्षण दिसते. मोबाईल हे साधनच असले
पाहिजे, ते व्यसन होता
कामा नये. सतत गाणी
ऐकल्यामुळे किंवा
मोबाईलवरून सतत संभाषण करीत राहिल्याने त्यातील
चुंबकीय लहरी मेंदूवर विपरीत
परिणाम करतात. पालकांनीच
या गोष्टी आपल्या मुलांना समजावण्याचा प्रयत्न करावा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.