सध्याच्या धकाधकीच्या आणि वेगवान जीवनात कुटुंबासाठी वेळ काढणे फार महत्त्वाचे आहे. इथे कुटुंबासाठी म्हटले असले तरी, रोजच्या धबडग्यातून तुम्हाला ताजेतवाने वांटण्यासाठी तुम्ही काही वेळ कुटुं बाबरोबर घालविला पाहिजे, त्यातून प्रत्येकाला आनंद मिळतो. त्याचबरोबर कुटुंबातील कर्ती व्यक्ती म्हणून ती तुमची जबाबदारीदेखील ठरते. कुटुंब एकमेकांमध्ये नात्याची वीण घट्ट असली पाहिजे. अनेकदा. मुलांकडून चुकीचे वर्तन घडते किंवा ती हाताबाहेर गेल्याची आपली भावना होते. आपल्या कुटुंबातील नात्याची वीण घट्ट नसल्यामुळे असे घडते. कुटुंबात एकमेकांबद्दल आपुलकीची भावना आणि आपलेपणाची भावना असण्याची गरज असते. या घरात माझे मतं ऐकून घेतले जाते, त्यावर चर्चा होते असे प्रत्येकाला वाटले पाहिजे. निर्णय लादण्यातून व्यक्तींमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते. रात्री जेवणाच्या वेळी, आठवड्यातून, महिन्यातून कौटुंबिक सहलीच्या निमित्ताने एकत्र आल्यास कौटुंबिक स्नेहसंबंध घट्ट होत जातात, मग त्यातून बाहेर पडण्याचा कुणीही विचार करू शकत नाही. कारण त्या नात्यामध्ये जी ऊब असते, ती बाहेरच्या जगात पैसे मोजूनही मिळत नाही.
सध्याच्या स्पर्धेच्या युगात मुलांमध्ये कौटुंबिक मुल्यांची जोपासना करणे अतिशय आवश्यक बनले आहे. दिवसेंदिवस वैयक्तिक महत्त्वकांक्षेपायी आणि वर्चस्व गाजवण्याच्या सुप्त इच्छेमुळे विवाहसंस्था धोक्यात आली आहे. घटस्फोटांचे प्रमाण वाढते आहे. अशा स्थितीत कुटुंबातील सदस्यांना धरून राहिल्यामुळे व्यक्ती विविध आघाड्यांवर किती प्रगती करू शकते, याची उदाहरणे द्या. ज्येष्ठांचा आदर आणि लहान मुलांशी प्रेमाने वागण्याचे संस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर मुलांमध्ये प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी या की गुणांची बीजं पेरा, त्याला खतपाणी घाला. कितीही वादळे आली तरी, प्रामाणिकपणा आणि कष्टाला पर्याय नाही. हेच दोन गुण माणसाला उच्च पातळीवर घेऊन जाणारे आहेत हे नेहमी लक्षात ठेवो. लहान-लहान गोष्टींतून आणि तुमच्या वर्तनातून मुलांना जगण्यांचे धडे द्या. त्यांना वाचनाची सवय लावा. त्यातून सर्वसमावेशक आणि सर्व अंगाने विचार करण्याची सवय त्यांना लागेल. तुम्ही त्यांला घरात जगण्याचे धडे शिकवले नाहीत मूल नक्कीच बाहेरच्या जगात शिकणार आणि मग ते तुमच्या नियंत्रणात राहीलच असे नाही. लक्षात ठेवा, तुमच्या मुलांना बाहेरच्या जगात ठेचकाळून, टक्केटोपणे खाऊनच शिकले पाहिजे असे नाही. तुमुच्या अनुभवांतून, वाचनातून त्याचे व्यक्तिमत्व घडविणे तुमच्या हातात आहे. त्यासाठी तुम्ही मुलांसाठी आवर्जून वेळ दिला पाहिजे.
तुम्ही वाचलेली चांगली पुस्तके, पाहिलेले चांगले चित्रपट, विविध व्यक्तीची वैशिष्ट्ये, चांगुलपणा यांची चर्चा मुलांबरोबर केली पाहिजे. त्यातूनच मुलांची जडणघडण होते. त्याचबरोबर तुमच्याविषयी आदर भावना वाढीस लागते.
या सगळया
गोष्टीतून तुमच्या कुटुंबात एकीची भावना वाढीस लागते. सगळ्यांना एकत्रित बांधून ठेवण्यासाठी ती अतिशय महत्त्वाची असते. तुम्ही
जेव्हा कुटुंबासाठी वेळ देता तेव्हा त्याचे
चांगले परिणाम नजीकच्या काळात तुम्हाला अनुभवायला मिळतात. परिणामी, कुटुंबावर जेव्हा एखादे संकट येते किंवा अडी-अडचणी निर्माण होतात तेव्हा, सगळे एकजुटीने उभे राहिल्याचे चित्र यामुळेच
पाहायला मिळते.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.