वाढत्या बांधकामामुळे वाढणारे धूलिकण, विस्तारित शहरांमुळे पूर्वी दूर असणारी औद्योगिक क्षेत्रं जवळ येणे, अशा वाढत्या शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसणे, त्यातून वाढलेली दुचाकी आणि चारचाकींची संख्या. त्याचवेळी आपली वाहतूक व्यवस्था (रस्ते, पूल, बाह्य वळणे) पुरेशी विकसित झालेली नसल्यामुळे वाहनांमुळे वाढणारे वायुप्रदूषणात कमालीची भर पडली आहे.
वाढत्या
शहरीकरणाबरोबरच शहरांतील दिवसेंदिवस वाढत्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
देशातील सर्वाधिक प्रदूषित अशी दिल्ली, रायपूर,
पाटणा, अहमदाबाद आणि ग्वाल्हेर या
शहरांची ओळख आहे. त्यातही
राजधानी दिल्लीचा देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये प्रथम क्रमांक लागतो. यावरून या प्रदूषणाच्या समस्येने
किती गंभीर रूप धारण केले
आहे, याची कल्पना येते.
साहजिकच
दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तातडीने
प्रयत्न करणे गरजेचे ठरत
आहे. उच्च न्यायालयानेही सरकारला
दिल्लीतील वाढते प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. आता
तर दिल्लीत हवेतील प्रदूषणाची पातळी आणखी वाढली आहे.
सर्वत्र धूळ आणि धुकं
पसरल्यासारखं वातावरण असल्यानं सरकारला काही दिवस शाळा
बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. एवढंच नाही तर लोकांनी
शक्यतो अधिक वेळ घरातच
थांबावे असेही आवाहन करण्यात आले. आता तरी
आपण प्रदूषण कमी करण्याबाबत गांभीर्याने
प्रयत्न करणार का, खरा प्रश्न
आहे.
मुंबईतही सातत्याने होत असलेल्या हवामानातील बदलांमुळे वाढत असलेला उष्मा, धूळ आणि धुरळामिश्रित बदलती हवा मुंबईकरांच्या समस्या रोज वाढवतच आहे. वडाळा, चेंबूर, सायन या परिसरात राहणारे कित्येकजण घरात धूळ येऊ नये म्हणून खिडक्या दरवाजे सतत बंद ठेवतात, पण धुळीला चाप लावताना सूर्यप्रकाशही अडवला जातो, असे कान नाक घसा तज्ञ सांगतात. प्रदूषणामध्ये सल्फरची पातळी वाढली की फुफ्फुसाचे आजार बळावतात. डोळ्यांची जळजळ होणे, त्वचेला खाज सुटणे, डोळ्यातून पाणी येण्यासारखा त्रास होतो. ऑक्सिजनची पातळी खालावून चक्कर येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, मळमळणे, डोक्याच्या मानेमागील भाग दुखत राहण्याचा त्रास हवेतील धुळीमुळे वाढतो. खरेतर औद्योगिकीकरणाला मोठ्या प्रमाणावर दिली जात असलेली चलना तसेच वेगाने होत असलेले शहरीकरण या बाबी वाढत्या प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत. सधारणपणे आपल्याकडे वायू प्रदूषण होते त्यामध्ये वाहनांमधून सोडले जाणारे कार्बन मोनॉकसाइड, हायड्रोकार्बन, नायट्रोजन ऑक्साईड असे घटक उच्च पातळीत असतात. तसेच खराब रस्ते व जीवाश्म इंधनाचे ज्वलन धुळीकणांच्या प्रदूषणासाठी जबाबदर असते. वायू प्रदूषणास गेल्या काही वर्षांत सर्वात कारणीभूत ठरलेला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे बांधकामक्षेत्र.
थोडक्यात
काय तर वाढते शहरीकरण, वाढत्या
बांधकामामुळे वाढणारे धूलिकण, विस्तारित शहरांमुळे पूर्वी दूर असणारी औद्योगिक
क्षेत्रं जवळ येणे, अशा
वाढत्या शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम
नसणे, त्यातून वाढलेली दुचाकी आणि चारचाकींची संख्या.
त्याचवेळी आपली वाहतूक व्यवस्था
(रस्ते, पूल, बाह्य वळणे)
पुरेशी विकसित झालेली नसल्यामुळे वाहनांमुळे वाढणारे वायुप्रदूषणात कमालीची भर पडली आहे.
यात
प्रदूषणाचा घटक तेवढाच महत्त्वाचा
आहे. एखादया कारणामुळे उद्धभवणारी समस्या आणि त्या समस्येचे
निराकरण करण्यासाठीचा खर्च असा परस्परपूरक
संबंध (कोरिलेशन) लावणे गरजेचे असते. तेव्हाच समस्येवर ठोस उपाय काढता
येऊ शकतो. काही
महिन्यांपूर्वी दिल्लीत प्रदूषण वाढले होते म्हणून खासगी
वाहने वापर कमी करा,
डिझेल गाड्या नको, सॅम-विषम
तारखा व गाडीक्रमांकानुसार वाहने
वापरा अशा तकलादू तोडग्यांचे
उपाय केले गेले. पण,
आजारच मोठा त्याला साध्या
औषधांनी उतार पडल्यासारखे वाटले,
तरी तो मधूनमधून पुन्हा
त्रास देणार हे निश्चित. दिल्लीसारखीच
अवस्था मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाधिक, नागपूर, बंगळुरू, कोलकाता, चेन्नई या शहरांचीही आहे.
रस्ते अपुरे पडत आहेत, प्रदूषण
वाढत आहे, वाहनकोंडी वाढत
आहे, पार्किंगला जागा नाहीत, शहरांत
अपघात वाढत आहेत. यावर
उपाय एकच आहे तो
म्हणजे सार्वजनिक वाहनांचा वापर वाढविणे व
खासगी वाहन वापर कमी
करणे.

0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.