हल्ल्यांचे प्रकार निव्वळ अफवांमुळे होत असून, असे संदेश अथवा छायाचित्र, व्हिडिओ पुढे पाठवल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर 'सायबर दहशत माजवणारे जे नेटकरी (अफवा पसरवणारे) समाजकंटकआहेत, त्यांचा वेळेत बंदोबस्त झाला पाहिजे. नाहीतर, सोशल मीडिया हा संवादाचे कमी आणि समाजात तेढ निर्माण करण्याचे काम अधिक करेल.
-दादासाहेब येंधे
अलीकडील
काही दिवसांपासून धुळे व शेजारील
जिल्ह्यात तसेच राज्यात लहान
मुलांना पळवून नेणारी टोळी आली असून
ती लहान मुलांना पळवून
नेत असल्याबाबत समाजकंटकाकडून अफवा पसरवली जात
आहे. काही ठिकाणी कोणतीही
शहानिशा न करता निरपराध
इसमांवर हल्ले होऊन वाहनांची जाळपोळ,
मारहाण करून लोकांना मारून
टाकण्यापर्यंतच्या गंभीर घटना घडल्या आहेत. नंतर अशा घटनांमध्ये
सदर इसम निरपराध, कामानिमित्ताने
आलेले निष्पन्न होवून हल्लेखो र व्यक्तींवर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.
अशा प्रकारच्या अफवा समाजातील काही
समाजकंटक जाणीवपूर्वक पसरवून समाजातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात
आणत आहेत.
जगभरात विखुरलेल्या लोकांमधील अंतर कमी करण्याचा उद्देश या पाठीमागे होता. विश्वाला जवळ आणण्याचा हा प्रयत्न होता. पण सामाजिक जीवनातल्या कुविचारांमुळे सोशल मीडियाचा वापर विध्वंसासाठी होत आहे. आजच्या काळात सायबर बुलिंग, सायबर स्टॉकिंग, इंटरनेट ट्रॉलिंग, अपमान, अश्लील पोस्ट, लहान मुलांचे शोषण केले जात आहे, तर काही वेळा सोशल मीडियावरील खाते किंवा अकाऊंटमधून ओळख करून देणाऱ्या माहितीची चोरी केली जाते. सामूहिक अनागोंदीमुळे कधी दंगल होते तर काही वेळा एखाद्या समूहामध्ये भयाची भावना निर्माण होते. काही वेळा अनावधानाने दहशतवादाला खतपाणी घातले जाते. तर काही वेळा निर्दोष व्यक्तींवर काल्पनिक खटले चालवून ताबडतोब त्याला गुन्हेगारही ठरवले जाते. इंटरनेट आणि दूरसंचार या माध्यमांच्या मदतीने एकमेकांशी आभासी माध्यमातून जोडल्या गेलेल्या लाखो लोकांच्या गर्दीला सकारात्मक दिशाही देता येते आणि नकारात्मक दिशाही देता येते. मात्र, खेदाची गोष्ट ही की अदृश्य पण एकमेकांशी जोडलेल्या गर्दीला विशिष्ट स्वार्थासाठी किंवा एखाद्या गैरसमजामुळे किंवा पूर्वग्रह यांच्यामुळे समाजात दुफळी माजण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे सोशल मीडियामुळे अराजकता माजू शकते. सोशल मीडियाचा वापर इतर व्यक्तीविरोधात दुष्प्रचार आणि द्वेष पसरवण्यासाठीच जास्त प्रमाणात केला जात असल्याचे चित्र सध्या समोर येत आहे. अनेकदा कोणत्याही व्यक्तीबाबत कोणताही खटला दाखल न करता, सत्यासत्यता न पडताळता, त्या व्यक्तीची बाजू न ऐकता सोशल मीडिया त्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवून रिकामा होतो. पण, याबाबत समूहाची मानसिकता लागू होते आणि एखाद्या व्यक्तीबद्दल खूप अधिक संख्येने लोक बिनबुडाची वक्तव्ये करतात तेव्हा ते सत्यच आहे से मानले जाते. सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या बदनामीमुळे अनेकांची आयुष्ये उद्ध्वस्त झाली आहेत.
सोशल मीडियाच्या वापराने आपल्याला जगाशी कनेक्ट होता येते, पण त्याचा अतिवापर टाळण्याची गरज आहे. वास्तविक सोशल मीडियाचा वापर योग्य माहितीचा प्रसार करण्यासाठी केला पाहिजे. माहितीची सत्यता पडताळून जर ती शेअर केली तर, लोकांना चांगली आणि योग्य माहिती मिळू शकते. आपण किती वेळ सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर करतो आणि तो कशासाठी करतो, याचा विचार करायला हवा. व्हॉट्सअप, फेसबुकसारखे तंत्रज्ञान हे जगण्यासाठी जसे मदत कायद्यानुसार थेट गुन्हे दाखल करावेत. नागरिकांनी केवळ ऐकीव माहितीवरून अफवांवर विश्वास ठेवून कायदा हातात घेऊ नये. कोणी व्यक्ती संशयास्पद वाटली तर कायदा हातात न घेता पोलिसांना माहिती द्यावी. सोशल मीडियामुळे परदेशात राहूनही आपल्या देशातील परिस्थिती खराब करण्यात समाजकंटकांना यश येत आहे. खरेतर आपण अविचारी वागतो याचा ते फायदा घेतात. त्यामुळे कोणताही संदेश आपल्याला त्याची सत्याता माहीत असल्याशिवाय पुढे पाठवणे गुन्हा ठरतो. सध्या याचा प्रचार अतिवेगाने होत आहे. ज्या संदेशामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडते आहे, हे लक्षात येईपर्यंत तो इतका व्हायरल झालेला असतो की, त्याला आळा घालणे करणारे ठरते तसेच त्याचा योग्य कठीण होऊन जाते. समाजात उपयोग झाला नाही तर काय होते हे धुळ्यातील मुले पळविणारी टोळी समजून घडलेल्या खुणांतून स्पष्ट होते. धुळे जिल्ह्यात जमावाने केलेल्या हल्ल्यात पाच भिक्षुकांना प्राणास मुकावे लागले. हल्ल्यांचे प्रकार निव्वळ अफवांमुळे होत असून, असे संदेश अथवा छायाचित्र, व्हिडिओ पुढे पाठवल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर 'सायबर दहशत माजवणारे जे-जे नेटकरी (अफवा पसरवणारे) समाजकंटक आहेत, त्यांचा वेळेत बंदोबस्त झाला पाहिजे. नाहीतर, सोशल मीडिया हा संवादाचे कमी आणि समाजात तेढ निर्माण करण्याचे काम अधिक करेल.

0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.