सार्वजनिक मंडळांनी वायफळ खर्च बंद करून तो होणारा खर्च लोकांच्या सेवेसाठी करायला हवा. गणेश मंडळांनीदरवर्षी कमीत कमी एका खेड्याला दत्तक घेऊन सगळ्या सोयीसुविधा देऊन सुसज्ज करावे. त्यामुळे तेथील लोकांचेभले होईल. प्रत्येक काम सरकारचे आहे, असे म्हणून आपली जबाबदारी कुणीही दुसऱ्यावर ढकलू नये.
-दादासाहेब येंधे
आनंदात,
उत्साहाच्या वातावरणात आणि प्रथा-परंपरा
जपत आपले सण-उत्सव
साजरे करावे हा आपला शिरस्ता.
पण, गेल्या काही वर्षांत या
सणांचं स्वरुप पार बदललंय. लाऊडस्पीकर्सचा
वापर, अचकटविचकट हावभाव करत केली जाणारी
नृत्यं, पैशांचा डामडौल यामुळे आपल्या उत्सवांचं रूप पार बिघडून
गेलंय. सारे जग आमच्या
भारतीय संस्कृतीकडे या सणांमुळेच वेगळ्या
दृष्टीने पाहते आणि ज्या आदर्शचा वसा
आमच्या पूर्वजांनी चालू ठेवला तो
वसा आम्ही बिघडवू पाहत आहोत, सणांचे
इव्हेंट होताना पाहत आहोत, हे
मात्र आता कुठेतरी थांबवून
त्याच्यावर गांभीर्याने
विचार करण्याची वेळ आम्हा साऱ्यांवर
येऊन ठेपली आहे. दहीहंहीचा सण
जो पूर्वी गल्ली-बोळात, चाळीचाळीमध्ये ज्या उत्साहाने साजरा
व्हायचा ते आता दृष्य
दिसत नाही. उत्साह आहे; परंतु तो
त्याला आता स्पर्धेचे
आणि बक्षिसांचे गालबोट लागल्यामुळे हा उत्साह बक्षिसासाठीच
आहे की काय असेच
आता दृश्य दिसत आहे आणि
त्याचा परिणाम थरावरून पडून जखमी होण्याची प्रमाण
वर्षानुवर्षे वाढत परंतु ती
निकोप असावी, ती जीवघेणी नसावी.
या सणानिमित्त ध्वनिप्रदूषण हाही एक चिंतेचा
विषय बनला आहे. याला
जबाबदार म्हणजे मंडळा-मंडळातील स्पर्धा यानंतर येणारा आमच्या आदिमाया शक्तीचा जागर म्हणून आम्ही
ज्याकडे पाहतो तो नवरात्र. स्त्री
शक्ती जिला देवीचे रूप
दिले आहे, तिची पूजा
करण्याचे हे नऊ दिवस
मात्र आम्हीच तरुण-तरुणी रात्री
मस्त, धमाल करण्याची संधी म्हणून या
सणाकडे पाहतात आणि नको त्या
गोष्टी घडतात. या सर्वांचा विचार
केला तर सर्वांनीच याविषयी
विचार करण्याची वेळ आहे. लोकांनी
आपल्याकडेच यायला हवे. त्यातूनच गणेश
मंडळांमध्ये स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र
समोर येते. या स्पर्धेमुळे सार्वजनिक
गणेशोत्सवाचा मूळ हेतू हरवत
चालल्याचे चित्र
स्पष्ट दिसत आहे. गणपतीच्या
आगमनावर आणि विसर्जनावर कोट्यवधी
रुपयांचा चुराडा केला जातो. कर्णकर्कश्श
आवाजात गणपतीचे आगमन आणि विसर्जन
होते. खरेच याची गरज
आहे का? बरीचशी मंडळे
फटाक्यांची आतषबाजी
करतात, यावरही लाखो रुपये खर्च
होतात. आजच्या महागाईच्या जमान्यात एवढा खर्च करणे
योग्य आहे का? असा
प्रश्न प्रत्येक मंडळाने स्वतःला विचारायला हवा.
सार्वजनिक मंडळांनी
वायफळ खर्च बंद करून
तो होणारा खर्च लोकांच्या सेवेसाठी
करायला हवा. गणेश मंडळांनी
दरवर्षी कमीत कमी एका खेड्याला
दत्तक घेऊन सगळ्या सोयी-सुविधा देऊन सुसज्ज करावे.
त्यामुळे तेथील लोकांचे भले होईल. प्रत्येक
काम सरकारचे आहे, असे म्हणून
आपली जबाबदारी कुणीही दुसऱ्यावर ढकलू नये. गणेशोत्सव
'इव्हेंट' न ठरता तो
सर्वसमावेशक सण ठरावा. गणेशोत्सव
मंडळांच्या मंडपात जुगार आणि मिरवणुकीत मद्यपान
असे गैरप्रकार तर सर्रास नजरेस
पडत आहेत. एवढेच नव्हे तर डॉल्बीमुळे कर्णबधीर
होण्याची वेळ आली आहे,
तर मिरवणुकीतील दणदणाटाने हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. जास्तीत जास्त
युवकांना आपल्याकडे
आकर्षित करून घेण्यासाठी चित्रपटांतील
नटनट्यांना, राजकीय पुढाऱ्यांना जास्त महत्त्व दिले जात आहे.
समाजाला काय आवश्यक आहे यापेक्षा
युवकांना काय आवडते याला
विशेष महत्त्व दिले जात आहे.
खरेतर तरुणाच्य उन्मादाला कसे आवरायचे याचा
विचार होणे आवश्यक आहे.
उत्सवाचे इव्हेंटिकरण झाल्याने आवाजाची मर्यादा, मूर्तीची उंची, फटाक्यांचे आवाज अशा प्रकारची
बंधने घालणारे
नियम न्यायालयांना द्यावे लागतात. गणेशोत्सव हा कार्यकर्त्यांचा, तरुणांचा
उत्सव असल्याने तो उन्माद वाटत
कामा नये. महाराष्ट्राचा हा
महान सण प्रत्येक गणेशभक्ताला
साजरा करायचा असेल आणि तोदेखील
पर्यावरणाचा योग्य समतोल राखून तर तशी नियमावली
प्रत्येकाने आखली पाहिजे. तसेच
नवसाला पावणाऱ्या गणपतीचे फॅड, सेलिब्रिटींचा वावर,
या सगळ्या गोष्टींना अधिक महत्त्व न
देता लोकमान्यांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव साजरा केला पाहिजे, जेणेकरून
सणांचं बाजारीकरण होणं थांबेल आणि
जर असं केलं तरच
या सणांचं महत्त्व चिरकाल टिकेल. (लेखक
रंगारी बदक चाळ सार्वजनिक
गणेशोत्सव मंडळाचे
प्रसिद्धी माध्यमप्रमुख आहेत.)

0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.