Ticker

10/recent/ticker-posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे काम प्रशंसनीय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे काम प्रशंसनीय

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्यापद्धतीने मुंबईतील, राज्यातील स्थिती संयमाने हाताळत आहेत त्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. समाज माध्यमांतूनही त्यांचे कौतुक होत आहे.


कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री नागरिकांसोबत फेसबुक, ट्विटर, न्यूज चॅनेलच्या माध्यमातून संवाद साधत नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन करीत आहेत. तत्परता दाखवत संसर्ग रोखण्यासाठी लॉक डाऊनची अंमलबजावणी सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केली. वेळोवेळी जनतेसमोर येत, जनतेबरोबर संवाद साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील तमाम जनतेला कुटुंबप्रमुखाप्रमाणे काळजीचे संदेश देत आहेत.

ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे राज्याची एकूणच परिस्थिती हाताळत आहेत. त्याचा आम्हा प्रत्येकाला अभिमान आहेच. पण, त्यासोबतच त्यांच्या नेतृत्वाचा आदरही आहे. श्री. उद्धव ठाकरे हे मेहनती, संयमी, शांत व त्यांच्याकडे असलेला मुख्य गुण म्हणजे उत्कृष्ट नेतृत्व. या नेतृत्वाचा योग्य उपयोग करत ते जनतेला सोबत घेत कोरोनाविरुद्ध मजबुतीने लढा देत आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

मुख्यमंत्री पद सांभाळत असताना नागरिकांना घराबाहेर पडू नका असे सांगत असतानाच, 'तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो'. असे म्हणत त्यांनी लोकांची मने जिंकली आहेत. 'आकाश पांघरुनी जग शांत झोपलेले' अशा कवितेच्या ओळी म्हणत, 'तुम्ही आजपर्यंत मला जे सहकार्य केले त्या सहकार्याच्या जोरावर तर मी हे सर्व करत आहे. दुसरं आहे तरी कोण? असं जनतेला उद्देशून म्हणत असताना त्यांचा साधेपणा मनाला भावतो.

त्यांचा जनतेबरोबर सुरू असलेल्या संवादामध्ये कुठेही आरडाओरड नाही की, कुठेही आक्रमकपणा नाही की, कुठेही शब्दांची लाखोली दिसत नाही. एक आपल्याच घरातील ज्येष्ठ बंधुच जणू आपल्याला आपली काळजी घेण्यासाठी काही सूचना करतोय असेच करोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉक डाऊनच्या काळात उध्दवजींनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या संवादामधून एकंदरीत दिसून येत आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री, एक आक्रमक नेता असा कुठलाच आविर्भाव त्यांच्या संवादातून दिसत नाही. कोरोनाच्या संकटकाळात आपल्याशी एकदम साधेपणाने, मनापासून, कळकळीने आणि नेमक्याच संवादातून जनतेला घरातच राहण्याचा सल्ला ते देत आहेत, या संकटकाळात जनतेचा उध्दव ठाकरेंवरील विश्वासही कमालीचा वाढलेला दिसून येतोय.



टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या

  1. I have read your article on our cm Mr uddhav Thackerey. This is very motivate article and we people are really lucky to have cm like Mr Uddhav Thackerey. I congrulate writer of this article and wish he will continue write this type of article. In this situation our CM Mr Uddhav Thackerey is very cool and calm and handle it. Once again congrulate to writer and please keep it up.

    उत्तर द्याहटवा
  2. प्रिय दादासाहेब,
    आपण एकदम छान लेख लिहिला आहे.आपण लेखात म्हटल्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवाद साधताना जणू आपल्या घरातील सदस्यच वाटत आहेत.

    उत्तर द्याहटवा
  3. कोरोनाद्द्ल बातम्या ऐकत असताना भिती वाटते. पण, आपले माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा लॉक डाउनबद्द्ल पुढिल प्लान काय असणार याविषयी जनतेसोबतचा संवाद ऐकताना कोरोनाची भिती पळून जाते. आपण आपल्या लेखात लिहिल्याप्रमाणे जणू आपला मोठा भाऊच आपल्याला काही सांगत आहे असे वाटते. सदर लेखात माझ्या मनातील प्रतिबिंब उमटले आहे.

    उत्तर द्याहटवा

Please do not enter any spam link in the comment box.