Ticker

10/recent/ticker-posts

चाळीस वर्षानंतर भारतीय हॉकीचा कमबॅक

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुषांच्या संघाने हॉकीमध्ये कांस्यपदक

-दादासाहेब येंधे

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुषांच्या संघाने हॉकीमध्ये कांस्यपदक जिंकले. चाळीस वर्षांनंतर भारताला हॉकीमध्ये ऑलिम्पिक पदक मिळाले आणि त्याचा आनंद गल्लीपासून दिल्लीपर्यंत ते लंडनपर्यंत साजरा केला. ऑलिंपिक पदकाचा विजय काय असतो ते भारताने चार दशकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अनुभवले. अगदी या सामन्याचे समालोचन करणारा सिद्धार्थ पांडे तसेच माजी हॉकीपटू विरेन रस्किन्हा देखील गहिवरले.


दोन दिवसापूर्वी भारताने उपांत्य फेरीत धडक मारली होती पण बेल्जियम बरोबरच्या संन्यामध्ये भारतीय खेळाडू काहीसे हळू खेळले व त्याची संधी बेल्जियम संघाने साधली. त्यामुळे ऑलिंपिकची अंतिम फेरी गाठण्याचे भारताचे स्वप्न अपुरे राहिले. तरीही दुसऱ्या दिवशी जर्मनीवर बरोबरच्या कांस्यपदकासाठी होणाऱ्या सामन्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. भारताने कांस्यपदक जिंकून हॉकीतील पदकांचा दुष्काळ संपुष्टात आणावा अशी साऱ्या देशाची इच्छा होती.


सकाळी सामना सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला जर्मनीच्या तिमूर ओरुझ याने पहिला गोल करून भारताला धक्का दिला. पंधरा मिनिटानंतर सिमरनजीत सिंगने फिल्ड गोल  करून भारताला बरोबरी आणले. पण सामन्याच्या दुसऱ्या क्वाटरमध्ये जर्मन खेळाडूंनी अवघ्या नऊ मिनिटांत दोन गोल करून भारतीय संघावर - अशी आघाडी घेतली. वेलेन आणि बेनेडिक्ट जर्मन संघासाठी फ्लिड गोल केले. याआधी उपांत्य फेरीत बेल्जियमने भारतावर पाच गोल झळकावले होते.  तर गटसाखळीत ऑस्ट्रेलियाने सात गोल केले होते. त्यामुळे जर्मनीचा संघ देखील भारताचा दणदणीत पराभव तर करणार नाही ना अशी भीती त्यावेळी सर्व भारतीयांना वाटत होती. पण, भारतीय संघाने इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असे केले कमबॅक केले. अवघ्या सात मिनिटांत चार गोल करून भारताने जर्मन संघावरील दडपण वाढविले. तरुण खेळाडू हार्दिक सिंग आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आघाडीच्या ड्रॅगफ्लिकरमध्ये समावेश होणारा हरमनप्रीत सिंह यांनी पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भारतीय संघाला बरोबरीत आणले. तर रुपिंदर सिंगने गेल्या सात वर्षांचा अनुभव पणाला लावून भारतीय संघाला जर्मनीवर आघाडी मिळवून दिली. भारताच्या या आक्रमकपणामुळे जर्मनीचा संघ सावरला नव्हता तो हार्दिक सिंगने सामन्याच्या चौथ्या मिनिटाला गोल करून भारताला - अशी आघाडी मिळवून दिली.


या सामन्यावर देशवासीयांच्या नजरा लागून होत्या. विजयानंतर अख्ख्या देशभरात जल्लोष सुरू झाला.चार दशकानंतर हॉकी संघाने जिंकलेल्या या पदकाचे देशात अपूर्व स्वागत होत आहे. भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाचा कर्णधार मनप्रित सिंगला फोन करून शुभेच्छा दिल्या. तसेच प्रशिक्षक यांच्याशीही चर्चा केली. उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर पंतप्रधानांनी फोन करून दिलेले प्रोत्साहन, मोलाचे शब्द फार महत्वाचे होते, असे सांगून प्रशिक्षण रीड यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.


ऑलिम्पिकमधील या  कांस्यपदकाने देशातील अनेक तरुण प्रोत्साहित होतील, अशी अपेक्षा माजी हॉकीपटू क्रीडा विश्लेषक व्यक्त करीत आहेत. हॉकीमध्ये भारताच्या पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानातील काही जणांनी भारताच्या विजयाचे दिलदारपणे कौतुक केले  आहे. भारतीय उपखंडातील हॉकीसाठी हा गौरवाचा क्षण असल्याचे हॉकीपटू  सांगत आहे. यावरून या कांस्य पदकाचे महत्त्व लक्षात येईल.




फोटो : google 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या