तुमच्या व्यक्तिमत्त्वाला कोणती हँडबॅग सूट होते हे जाणून घ्या...
-दादासाहेब येंधे
कोणत्याही कार्यक्रमासाठी जाताना, फिरायला जाताना किंवा खरेदीसाठी जाताना महिला आपल्याजवळ हँडबॅग वापरत असतात. या बॅग विविध प्रकारच्या आणि विविध डिजाईनच्या असतात. त्यामुळे चांगली हँडबॅग खरेदी करण्यासाठी महिलांची नेहमी गडबड सुरू असते. आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आणि चांगले दिसावे यासाठी त्या अनेक प्रकारच्या बॅग खरेदी करत असतात. कॉलेजपासून अगदी ऑफिसपर्यंत शॉपिंग पासून ते ट्रॅव्हलिंगपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक मुलीसाठी महत्त्वाचे जर काही असेल तर ती म्हणजे हँडबॅग... हँडबॅगशिवाय कोणत्याही महिलेचा लुक पूर्ण होत नाही. पण ही हँडबॅग गरजेसाठीच असते असं नाही. तर ती हँडबॅग देखील तितकीच स्टायलिश आणि तुम्हाला शोभेल अशी असायला हवी.
महिलांसाठी हँडबॅग आवश्यक वस्तूंसह फॅशन स्टेटमेंट बनले आहे. दुकानात विविध प्रकारच्या हॅन्डबॅग उपलब्ध असतात. मात्र महिलांमध्ये लेदर हँडबॅग आजही लोकप्रिय आहे. लेदर हँडबॅग महिलांना चांगले लूक प्रदान करते. यामुळे लेदर पर्सकडे महिला जास्त आकर्षित होतात. खरोखरच्या लेदरपासून बनवलेल्या वस्तू काही प्रमाणात महाग असतात. त्यामुळे बाजारात कमी किमतीत डुप्लिकेट लेदर बॅग आलेल्या आहेत त्या पासून सावध राहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
लेदर पिशवी म्हणून अशा ॲक्सेसरीसाठी निवडताना आपण लक्ष दिले पाहिजे, ती पहिली गोष्ट म्हणजे लेदरची गुणवत्ता. लेदरच्या पृष्ठभागावर कोणतीही अशुद्धता नसावी. उच्च गुणवत्तेचे योग्यरीत्या फीट केलेले लेदर नेहमीच मऊ आणि थोडेसे गुळगुळीत असते आणि ते जितके मऊ असेल तितकी त्याची किंमत जास्त असते.
आपल्या पर्सनॅलिटी आणि लुकची काळजी सगळेचजण घेतात. पण, तुम्ही कोणती हँडबॅग वापरता हेही तितकेच महत्त्वाचे आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला कोणती हँडबॅग सूट होते हे जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कित्येक महिलांना समजत नाही की, आपल्या व्यक्तिमत्त्वाला कोणती बॅग शोभून दिसेल. जर तुम्ही सुंदर हॅन्ड बॅग खरेदी करण्याचे ठरवले असेल तर तुम्ही तुमच्या बॉडी शेपनुसार कोणत्या प्रकारची हँडबॅग घ्यावी हे ठरवावे.
उंच आणि बारिक महिलांसाठी - जर तुमची उंची योग्य आहे आणि तुम्ही थोड्या स्किनी असाल तर लांब हॅंडबॅग घेऊ नका. रुंद, मोठ्या बॅगा तुम्हाला चांगल्या शोभून दिसतील.
कर्व्ही आणि प्लस साईज महिलांसाठी - जर तुमची साईज प्लस आहे. तर लहान आकाराच्या बॅगेमुळे तुम्ही अधिक मोठ्या दिसाल. मिडीयम आकाराच्या बॅग तुमच्या बॉडीला चांगला लूक देतील.
ॲप्पल शेपच्या महिलांसाठी - या महिलांचा आकार वरच्या बाजूला रुंद असतो अशा महिलांना छोट्या आकाराच्या तसेच छोट्या स्ट्रीप असलेल्या बॅग सूट करत नाहीत. आपण रुंद बॅग्स ट्राय करण्यास हरकत नाही.
बॅलन्स शेप महिलांसाठी - जर आपली फिगर एकदम बॅलन्स असेल तर मिडीयम आकाराच्या क्रॉसबॉडी बॅग्स निवडणे उचित ठरेल. या आपल्यावर छान सूट होतील.
क्रॉस शोल्डर बॅग - आजकाल क्रॉस शोल्डर बॅगेचा ट्रेंड आहे. आपले हात रिकामे ठेवून अधिक फ्री होऊन फिरण्यासाठी ही बॅग सर्वच महिलांसाठी खास आहे. यामध्ये विविध प्रकार आपल्याला बघायला मिळतात. जवळपास तुम्हाला कुठे जायचं असेल तर हि क्रॉस शोल्डर बॅग खांद्यावर लावून तुम्ही बिनधास्त घराबाहेर फिरू शकता. शिवाय ही बॅग तुम्हाला तुमच्या वेस्टर्न आउटफिटवर खूपच सुंदर दिसेल. यामुळे तुमच्या लुकला अधिक शोभा येईल.
टोटे बॅग्स- या बॅग नॉर्मल हँडबॅग्सपेक्षा आकाराने थोड्या मोठ्या असतात. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली अथवा ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांसाठी या बॅगेचा जास्त प्रमाणात उपयोग होतो. आपल्याला हव्या त्या वस्तू या बॅगमध्ये घेऊन जाणं यामुळे सोपं होतं. दिवसभराच्या लागणाऱ्या वस्तू या बॅगेमधून मुली व्यवस्थित सांभाळू शकतात. या बॅगमध्ये सर्व वस्तू नीट राहतात. तसेच या बॅग्स कॅरी करण्यास आपल्याला आरामदायक देखील वाटतात.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.