हल्ली खूप जास्त विचार होतोय
-दादासाहेब येंधे
एखादा कुर्ता, ड्रेस, शर्ट किंवा वेगवेगळ्या स्टाईलच्या जॅकेटपेक्षा तुमचे बूट एक महत्त्वाची भूमिका बजावतात. माणसाच्या पायातील बूट, पादत्राणे, चप्पल पाहून त्याची पारख केली जाते. म्हणजेच साधी स्लीपर असेल तर सर्वसामान्य, बऱ्यापैकी चप्पल आणि चकाकणारे पॉलिश केलेले बूट असतील तर श्रीमंत, स्पोर्ट शूज असतील तर खेळाडू असा प्राथमिक अंदाज बांधला जातो.
हल्ली चपला-बुटांचे एवढे प्रकार झालेत त्यामागचं कारण म्हणजे फॅशन. कपड्यांप्रमाणेच चप्पल, बुटांचीही फॅशन दिवसा आणि महिन्यागणिक बदलत आहे. कोणत्या प्रसंगी कोणते बूट, चप्पल बरी दिसेल याचा हल्ली खूप जास्त विचार होत असल्याने पायातल्या बुटाचं आणि चपलेचं हे फॅशनेबल जग झपाट्याने विस्तारत आहे आणि याचाच परिणाम शू मार्केटवर झालाय.
हाय हील्स शूज : हाय हिल्स प्रत्येक महिला किंवा नववधू त्यांच्या फॅशनसोबत वापरणे पसंत करतात. त्यामुळे लेहंग्याचा रंग, उंची व त्यामधील कॅनकॅनमुळे लेहंग्याचा फॉल खूप सुंदर दिसतो. तुम्हालाही असा फेअर लुक हवा असेल तर हाय हिल्स वापरणं अगदी गरजेचं आहे.
मोजडी : लग्नातील निरनिराळ्या विधींसाठी किंवा तुम्हाला एखाद्या समारंभासाठी जायचे असेल तर तुम्ही त्या समारंभात मोजडी नक्कीच घालू शकता पंजाबी आऊटफिट वर मोजडी शोभून दिसतात.
कोल्हापुरी चप्पल : जर आपण एखाद्या कार्यक्रमात नऊवारी साडी आपण परिधान करणार असाल तर कोल्हापुरी चप्पल चे विविध प्रकार बाजारात मिळतात. पण, जरा हटके प्रकार हवे असतील तर फूटवेअर कोल्हापूरवरूनच मागवावी लागेल.
फ्लॅट्स : फ्लॅट्स म्हणजे सपाट फुटवेअरची चलती नेहमीच राहिलेली आहे. विशेषतः कॉलेज तरुणांमध्ये त्याची क्रेझ खूपच आहे. यात रबर, स्ट्रॅप, स्लिम, प्लेन लेदर या प्रकारातील फुटवेअरची मागणी मोठ्या प्रमाणात आहे.
अँकल बूट्स : हे बूट सगळीकडे दिसून येतात अँकल बूट्स हे तुमच्या पायाच्या घोट्यापर्यंत असतात. त्यामुळे त्यांना अँकल बूट असे म्हणतात. ते बूट तुम्हाला कोणत्याही दुकानात सहज उपलब्ध होतात.
हाय नी बूट्स : बुटाचा हा प्रकार म्हणजे तुमच्या गुडघ्यापर्यंत येणारा असतो. हे बूट लांब असल्यामुळे त्याला एका बाजूने चैन दिलेली असते. त्यामुळे ते घातल्यानंतर बूट बंद करण्यासाठी चेन लावावी लागते.
चप्पल किंवा शूज खरेदी करताना त्यांचं सौंदर्यही तितकंच महत्त्वाचं असतं. हे प्रथम लक्षात घ्या. पायांना नुसता आराम मिळावा म्हणून नाही तर त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वातही भर पडली पाहिजे. आणि म्हणूनच आपल्या व्यक्तिमत्त्वाला अनुरूप व सुंदर अशा शुज, चप्पलची निवड करा. आणि हा! पादत्राणांची निवड ही स्वतःच करावी. कधीही कुणाच्याही पायांच्या मापावरून खरेदी करू नये.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.